*प्रतीक्षेत मी*
येशील ना रे सख्या मनाला सांभाळण्यासाठी
ते क्षणही आज आसुसले पुन्हा गंधाळण्यासाठी
विरहाच्या मंद मशाली साथीने पेटवण्यासाठी
किरणांनीही पांघरला सडा धरेला भेटण्यासाठी
ओढही तुझी मजला अविरत चालण्यासाठी
देत राहते मोका पुन्हा पुन्हा तुला वळण्यासाठी
बाहुत तुझ्या स्वप्नांना मी पाहे बहरण्यासाठी
प्रतीक्षेत मी तुझिया साऱ्या दुःखास हरवण्यासाठी
आसवांच्या गर्दीत हासु आशादीप दावण्यासाठी
आयुष्य झाले कविता तुला शब्दांशी जोडण्यासाठी
मावळतीच्या क्षणांना उगवतीस सांधण्यासाठी
सौख्याच्या क्षणांना तुजसमीप बांधण्यासाठी
*सौ छाया जावळे*
*वाई,सातारा*
*सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा