बुधवार, २ डिसेंबर, २०२०

एकाग्रता कविता

 *एकाग्रता*


एकाग्रता करतेय मनाची

स्वतःतच मी मग्न राहतेय

सहज म्हटलास विसर पण 

पापणीआड तुलाच पाहतेय


तुझा तो प्रेमळ संवाद

अजूनही घुमतोय कानात

दवबिंदुसम बोल कौतुके

झेललेत मनाच्या पानात


लुटलेस हासु माझ्यावरती

जीवनात गुलाब फुलला

तो सडा पांघरताच तनुवर

विरहाचा काटा कसा सलला


स्पर्शाची सुवर्ण आभा अन

हाती तुझा आश्वासक हात

गेलीत विरुनी ती कोठे वचने

आजन्म देणार होतास साथ


लढतेय आठवांशी तुझ्या

परि पाणावतात रे डोळे

विरह मंदाग्नीत जळून गेले

सारे प्रीतभाव माझे भोळे


*सौ छाया जावळे*

*वाई,सातारा*

*सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

विभाजक कविता

 *विभाजक* मी शांत झुळूक तर तू झंझावात, तरीही झालीच ना आपल्या नात्याची रुजवात... मी थोडीशी संयमी तू उतावीळ जरासा, तरीही क्षणोक्षणी वाटायचा सह...