*मनोमिलन*
वाटलंच नव्हतं कधी
आपली मने एक होतील
आठवांच्या भासात तुझ्या
अबोल ओठ गाणी गातील
ठाव घेई माझ्या हृदयाचा
मनोमिलनाचे गीत स्फुरेल
प्रहराही त्या तपासारख्या
स्मृतींचे रे पडसाद उरेल
तुझी प्रेमळ हाक मला
निनादत राहते कानात
बेभान मग मनापाखरू
तुजसमीप पोहचे क्षणात
तुझ्यात मी विरले अशी
ना ओळख माझी दुसरी
उगवते आठवात तुझ्या
इथं प्रत्येक सकाळ हसरी
*सौ छाया जावळे*
*वाई,सातारा*
*सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा