शुक्रवार, २७ नोव्हेंबर, २०२०

बिनधास्त कविता

 *बिनधास्त*


नेहमी म्हणायचास...

स्वतःसाठी थोडं जगून पहा..

भित्रेपणाचा बुरखा काढून

थोडी जरा बिनधास्त रहा...

मनोमन पटायचं रे मला

भिडायचा काळजात 

तो स्वर तुझा...

आशादायी प्रयत्नांच्या पथावर

चालायचा मग प्रवास माझा..

पुष्कळदा हरले मनाने

पण तू कायम राहिलास

मला धीर देत...

उद्विग्न मनाला सावरत

पुन्हा झेपावण्याचा

नवा विश्वास देत...

माझ्या स्वप्नासाठी

होत राहिलास कायम दुवा...

या मनाच्या चैतन्याची 

तूच तर होतास माझी दवा..

जगेन मी बिनधास्त....

आत्मनिर्भर होईन

माझ्यासाठी...

उमटवेल ध्येयाची

यशोगाथा नवी...

पण प्रत्येक वळणावर सख्या

तुझी मला साथ हवी...

तुझी मला साथ हवी...


*सौ छाया जावळे*

*वाई,सातारा*

*सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*

४ टिप्पण्या:

विभाजक कविता

 *विभाजक* मी शांत झुळूक तर तू झंझावात, तरीही झालीच ना आपल्या नात्याची रुजवात... मी थोडीशी संयमी तू उतावीळ जरासा, तरीही क्षणोक्षणी वाटायचा सह...