बुधवार, २ डिसेंबर, २०२०

आपुलकी कविता

 *आपुलकी*


घोर तिमिर हाटूनी

आसमंत सारा उजळू दे,

मुखामुखात आज येथे

हास्य गाली पसरू दे,


सौख्य बरसात होऊनी

दुःख मळभ जाऊ दे,

कणाकणात इथल्या

ईश वास्तव्य राहू दे,


संपू दे कुविचार सारे

सुविचारी होऊ दे,

प्रेम,आपुलकी,विश्वास

नात्यांमध्ये राहू दे,


लक्ष्मीच्या पावलांनी

सुख घरी येऊ दे,

समाधानात घर माझे

अखंडपणे न्हाऊ दे,


दीपोत्सव हा दिव्यांचा

सुख सरीत भिजू दे,

मनामनात आज साऱ्या

हर्ष पडघम वाजू दे.


*सौ छाया जावळे*

*वाई,सातारा*

*सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

विभाजक कविता

 *विभाजक* मी शांत झुळूक तर तू झंझावात, तरीही झालीच ना आपल्या नात्याची रुजवात... मी थोडीशी संयमी तू उतावीळ जरासा, तरीही क्षणोक्षणी वाटायचा सह...