*पणती होऊया*
आज मनातनं आवतान मिळालं
होऊन पाहूया पणती जरा...
अंधकार भेदण्याचा प्रयत्न
करूया तर मनापासुन खरा...
कुटीत तर नेहमीच एकटी
आज त्यांचे अंगणही खुलवेन...
गरिबीचे चटके सदा सोबती
स्मितहास्यात त्यांना झुलवेन...
दांभिकतेचा, असत्याचा टेंभा
किती काळ प्रकाशित राहील...
सत्याची मी बनून चिंगारी
क्रांतीच्या पखाली वाहील...
रायरेश्वराच्या प्रतिज्ञेत मी साक्षी
भीमरावांची संगिनी ज्ञानाची...
कधी देत धातुला चटके
झळाळी देते मी सोन्याची...
म्हणून वाटतंय आज मला
मनामनात तेवणारी पणती होऊया...
कुमार्गाचे मळभ झटकावत सारे
संस्काराचा नंदादीप देऊया....
संस्काराचा नंदादीप देऊया.....
*सौ छाया जावळे*
*वाई,सातारा*
*सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा